Pawankhinda Release Date: 'पावनखिंड' चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
येत्या 18 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीम यांनी सोशल मीडियावर जाहीर केल आहे.
विविध ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास चित्रपटातून समोर आणला. त्यापैकीच इतिहासातल्या अतुलनीय पराक्रमाची परिसीमा म्हणजे पावनखिंडीचा रणसंग्राम. हा रणसंग्राम ते मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. चित्रपटाची झलक पाहिल्यापासून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. याआधी हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र त्यानंतर याचवर्षी 2022 मध्ये 21 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरलं होतं. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थीतीत आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 18 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीम यांनी सोशल मीडियावर जाहीर केल आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)