Pawankhinda Release Date: 'पावनखिंड' चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
कोरोनाग्रस्त परिस्थीतीत आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 18 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीम यांनी सोशल मीडियावर जाहीर केल आहे.
विविध ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास चित्रपटातून समोर आणला. त्यापैकीच इतिहासातल्या अतुलनीय पराक्रमाची परिसीमा म्हणजे पावनखिंडीचा रणसंग्राम. हा रणसंग्राम ते मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. चित्रपटाची झलक पाहिल्यापासून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. याआधी हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र त्यानंतर याचवर्षी 2022 मध्ये 21 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरलं होतं. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थीतीत आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 18 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीम यांनी सोशल मीडियावर जाहीर केल आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2022 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

