नागराज मंजुळे यांच्या Ghar Banduk Biryani सिनेमाचा टीझर आऊट; पहा Video

फँड्री, सैराट आणि नाळ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'घर बंदुक बिरयाणी' असं या सिनेमाचं नाव असून याचा टीझर आऊट झाला आहे.

Ghar Banduk Biryani Movie Teaser (Photo Credits: Instagram)

फँड्री, सैराट आणि नाळ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'घर बंदुक बिरयाणी' असं या सिनेमाचं नाव असून याचा टीझर आऊट झाला आहे. यात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे कलाकार असल्याचे या टीझरमधून स्पष्ट होते. दरम्यान, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली असल्याने आणि सिनेमाच्या नावावरुन प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now