Mogal Mardini Chhatrapati Tararani Motion Poster: अभिनेत्री Sonalee Kulkarni च्या मुख भूमिकेतील पहिल्या हॉलिवूड मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित
हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते या मराठी हॉलिवूड सिनेमाच्या निर्मितीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे या आगामी भव्य दिव्य सिनेमाची सार्यांनाच उत्सुकता आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हीची प्रमुख भूमिका असलेल्या मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी (Mogal Mardini Chhatrapati Tararani)सिनेमाचं मोशन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. पुढील वर्षी दिवाळीत हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. दरम्यान हा बिग बजेट सिनेमा मराठी आणि इंग्रजीत साकारला जाणार असून पहिला मराठीतील हॉलिवूड सिनेमा आहे. महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. मुघलांशी दोन हात करत स्वराज्य सांभाळणार्या या रणरागिणीचा पहिल्यांदाच भव्य दिव्य रूपात इतिहास रसिकांना पाहता येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)