Mogal Mardini Chhatrapati Tararani Motion Poster: अभिनेत्री Sonalee Kulkarni च्या मुख भूमिकेतील पहिल्या हॉलिवूड मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते या मराठी हॉलिवूड सिनेमाच्या निर्मितीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे या आगामी भव्य दिव्य सिनेमाची सार्‍यांनाच उत्सुकता आहे.

Mogal Mardini Chhatrapati Tararani Motion Poster: अभिनेत्री Sonalee Kulkarni च्या मुख भूमिकेतील पहिल्या हॉलिवूड मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित
मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी । PC: Instagram / Sonalee Kulkerni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हीची प्रमुख भूमिका असलेल्या मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी (Mogal Mardini Chhatrapati Tararani)सिनेमाचं मोशन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. पुढील वर्षी दिवाळीत हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. दरम्यान हा बिग बजेट सिनेमा मराठी आणि इंग्रजीत साकारला जाणार असून पहिला मराठीतील हॉलिवूड सिनेमा आहे. महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. मुघलांशी दोन हात करत स्वराज्य सांभाळणार्‍या या रणरागिणीचा पहिल्यांदाच भव्य दिव्य रूपात इतिहास रसिकांना पाहता येणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2021 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).