Maval Jaga Zala Ra Official Song: 'सुभेदार' चित्रपटामधील 'मावळं जागं झालं जी' गाणं रसिकांच्या भेटीला (Watch Video)

'सुभेदार' या सिनेमात अभिनेते अजय पुरकर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत तर चिन्मय मांडलेकर या सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Subhedar | You Tube

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर च्या आगामी  'सुभेदार' चित्रपटामधील 'मावळं जागं झालं जी' गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे.  शिवराज अष्टकातील हा पाचवा सिनेमा आहे. दरम्यान लोकाग्रहास्तव आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आल्याची आनंदाची बातमी देखील देण्यात आली आहे. 25 ऑगस्ट ऐवजी हा सिनेमा 18ऑगस्टला रीलीज होणार आहे. देवदत्त बाजी आणि अवधूत गांधी यांच्या आवाजात हे गाणं आहे. तर त्याचं संगीत दिग्दर्शन देवदत्त बाजी यांनी केलं आहे. 'सुभेदार' या सिनेमात अभिनेते अजय पुरकर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत तर चिन्मय मांडलेकर या सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. Subhedar Teaser इथे पहा.

पहा गाण्याची पहिली झलक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now