Jai Jai Maharashtra Majha Song From Maharashtra Shaheer : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची 'महाराष्ट्र शाहीर' च्या माध्यमातून पुन्हा निर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च

'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा 28 एप्रिल दिवशी रिलीज होणार आहे.

Jai Jai Maharashtra Majha | You Tube

महाराष्ट्राचं राज्यगीत ' जय जय महाराष्ट्र माझा' ची पुन्हा निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याला स्वरसाज अजय गोगावले याचा आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या निमित्ताने ही पुन्हा निर्मिती करण्यात आली आहे. आज एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते हे गाणं लॉन्च करण्यात आले आहे. राज्य सरकार कडून काही दिवसांपूर्वीच  'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे.  नक्की वाचा: Maharashtra Shaheer Trailer: अभिनेता Ankush Chaudhari ची मुख्य भूमिका असलेला शाहीर साबळेंच्या जीवनपटाचा ट्रेलर जारी (Watch Video) .

पाहा नव्या अंदाजात जय जय महाराष्ट्र माझा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)