Dharmaveer: प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटात उलगडणार शिवसैनिक आनंद दिघे यांचा जीवनपट; पहा मोशन पोस्टर
दिग्दर्शक प्रविण तरडे 'धर्मवीर’ या आगामी चित्रपटात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणार्या आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणार आहेत.
दिग्दर्शक प्रविण तरडे 'धर्मवीर’ या आगामी चित्रपटात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणार्या आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणार आहेत. मंगेश देसाई या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. दरम्यान ठाण्यात शिवसेनेला बळकटी देण्यामध्ये मोठा वाटा हा आनंद दिघे यांचा आहे. 2001 मध्ये गणेशोत्सवादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. जखमी आनंद दिघेंवर ठाण्यातल्या रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आलं, पण नंतर हृदयरोगाच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)