Ghe Double Marathi Movie: ‘घे डबल’चा धम्माल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, 30 सप्टेंबरला चित्रपट होणार रिलीज

विश्वास जोशी यांनी ‘घे डबल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या 30 सप्टेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ghe Double Marathi Movie (Photo Credit - Twitter)

जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ चित्रपटाचे भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पोस्टरवरील भाऊ आणि भूषण यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आज याच चित्रपटाचा टीझर सगळ्यांच्या भेटीला आला आहे. विश्वास जोशी यांनी ‘घे डबल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या 30 सप्टेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या खळखळून हसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेता भूषण पाटील बरोबरच छाया कदम, भारत गणेशपुरे, किशोर कदम, ओमकार भोजने, विद्याधर जोशी आणि संस्कृती बालगुडे अशी तगडी स्टारकास्टही पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now