Baipan Bhari Deva Box Office Collection: 'बाईपण भारी देवा' ठरला यंदाच्या वर्षातील विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा; दिग्दर्शक केदार शिंदेंची भावूक पोस्ट

केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमामध्ये वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी,दीपा परब चौधरी आणि सुकन्या मोने प्रमुख भूमिकेत आहेत.

Bai Pan Bhari Deva | Twitter

कोविड नंतर बॉक्सऑफिसवर अनेक सिनेमे दणकून आपटले आहेत. मराठी सिनेमातही थोड्या फार प्रमाणात तसंच चित्र होतं. पण केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा सुसाट चालला आहे. 30 जूनला रिलीज झालेला हा सिनेमा यंदाच्या वर्षात  विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. या सिनेमाचं विकेंडचं नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन 6.45 झालं आहे. यावर केदार शिंदेंनीही भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 'ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे "हाऊसफुल्ल" चे बोर्ड मी पाहातो आहे.' असं ट्वीट केलं आहे. दरम्यान 'बाईपण भारी देवा'हा सिनेमा 6 बहिणींभोवती फिरतो. मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने बहिणी-बहिणींमध्ये झालेला समज-गैरसमजांचा गुंता कसा सुटतो याची ही कहाणी आहे. Mangalagaur Song: 'बाईपण भारी देवा’ चित्रपटातील मंगळागौर गाणे प्रेक्षकांच्या भेटीला .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now