Chandramukhi Trailer: प्रेक्षकांना पाहायला मिळणार राजकारणी आणि कलावंतिणीची प्रेमकाहाणी, चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रसाद ओकने (Prasad Oak) 'चंद्रमुखी'चं दिग्दर्शन केले आहे. तर या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि अदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आहे. तसेच हा चित्रपट 29 एप्रिला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Chandramukhi Trailer (Photo Credit - Youtube)

सध्या चंद्रमुखी (Chandramukhi) चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट रिलीज साठी सज्ज झाला असुन नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये एका राजकारणी आणि लावणी कलावंतिणीची प्रेमकहाणी रसिकांना पाहता येणार आहे. विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या कादंबरीवर लिखित ही काहाणी बेतलेली आहे. तर सिनेमाला अजय-अतुलचं (Ajay-Atul) संगीत असल्याने पुन्हा लावण्या आणि ठसकेबाज संगीताचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रसाद ओकने (Prasad Oak) 'चंद्रमुखी'चं दिग्दर्शन केले आहे. तर या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि अदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आहे. तसेच हा चित्रपट 29 एप्रिला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement