Albattya Galbattya: वैभव मांगले चिंची चेटकिणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, सिनेमाचा टीझर प्रदर्शित

या चित्रपटात वैभवसोबत अक्षय मिटकल, शंतनू गांगणे, लोकेश मांगडे, मनीष पिंपुटकर, अनुष्का पिंपुटकर, विराज टिळेकर, अभय पिंपुटकर, सोनिया सहस्त्रबुद्धे, यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चिंची चेटकीण आणि गुप्तधनाची गोष्ट सांगणाऱ्या अलबत्त्या गलबत्त्या नाटकाने रंगभूमी गाजवल्यानंतर आता सिनेमाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. अभिनेता वैभव मांगले चिंची चेटकिणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या टीझर मध्ये वैभव चिंची चेटकिणीच्या रूपात दिसत असून "किती गं बाई मी हुशार" हे चेटकिणीचं लाडकं वाक्य ऐकू येते.  या चित्रपटात वैभवसोबत अक्षय मिटकल, शंतनू गांगणे, लोकेश मांगडे, मनीष पिंपुटकर, अनुष्का पिंपुटकर, विराज टिळेकर, अभय पिंपुटकर, सोनिया सहस्त्रबुद्धे, यांच्या मुख्य भूमिका आहेत. वरुण नार्वेकर याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

पाहा टिझर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Udharnarth Nirmit (@udharnarth)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement