Maidaan: म्हैसूर कोर्टाने अजय देवगण स्टारर मैदानाच्या रिलीजवर घातली बंदी, कथा चोरल्याचा आरोप!
अजय देवगण स्टारर 'मैदान' हा सिनेमा 11 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज होता, मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. म्हैसूर कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी कथा चोरल्याचा आरोप आहे. कर्नाटकातील एका पटकथा लेखकाने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Maidaan: अजय देवगण स्टारर 'मैदान' हा सिनेमा 11 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज होता, मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. म्हैसूर कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी कथा चोरल्याचा आरोप आहे. कर्नाटकातील एका पटकथा लेखकाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनिल कुमार यांच्या याचिकेची दखल घेत म्हैसूरच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. अमित शर्मा दिग्दर्शित मैदान या चित्रपटात अजय देवगण आणि प्रियामणी मुख्य भूमिकेत आहेत.
पाहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)