Latest Bhojpuri Song 2025: भोजपुरी गाणे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भोजपुरी संगीत अनेकांना फार आवडते. दरम्यान, भोजपुरीत आणखी एक धमाकेदार गाणं रिलीज झालं आहे. 'चांद के पार ले जैबा का' हे गाणे टी-सीरीजच्या भोजपुरी यूट्यूब चॅनलवर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागलं आहे. हे गाणे समर सिंह आणि शिल्पी राज यांनी गायले आहे, तर सुनील यादव सुरेला यांनी लिहिले आहेत. 'चांद के पार ले जैबा का' एक रोमँटिक ट्रॅक आहे, ज्यामध्ये समर सिंह आणि शिल्पी राज यांची जोडीने शानदार परफॉर्मन्स दिला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांमधील जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणे रिलीज होताच युट्युबवर लाखो व्ह्यूज मिळाले असून ते वेगाने व्हायरल होत आहे. चाहते देखील या गाण्याला सुपरहिट म्हणत सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. हेही वाचा: Pak Actress Mawra Hocane Marries Ameer Gilani: सनम तेरी कसम फेम पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन अडकली विवाह बंधनात, येथे पाहा लग्न सोहळ्याचे फोटो
येथे पाहा, चांद के पार ले जैबा का चा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)