सुपरस्टार सूर्या (Suriya Sivakumar) एक्शन,रोमँटिक सिनेमांसाठी ओळखल्या जातो मात्र आता तो एका वेगळ्या थाटणीचा 'जय भीम' (Jai Bhim) चित्रपट घेऊन आला असून या सिनेमातून सूर्या आपल्या वेगळ्या अभिनयाचे  दर्शन त्याच्या चाहत्यांना देणार आहे.'जयभीम' २ नोव्हेंबर रोजी ऍमेझॉन प्राइमवर तामिळ भाषेत प्रदर्शित होत असल्याची निर्मात्यांकडून घोषणा करण्यात आली. परंतु देशभरातून 'जय भीम' सिनेमा हिंदीत सुद्धा रिलीज करण्यात यावा अशी मागणी चाहत्यांकडून ऍमेझॉन आणि निर्मात्यांकडे करण्यात आली होती पण याची आता प्रतीक्षा संपली असून या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. न्यायाच्या विरुद्धचा लढा दाखवणारा जय भीम चित्रपट एक कोर्ट रूम ड्रामा असून अभिनेता  यात एका वकिलाच्या भूमिकेत दिसेल. हिंदी आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.सिनेमाचे दिग्दर्शन लेखक-पत्रकार असलेले टी.जे.नानवेल(T.J.Gnanavel) यांचे आहे तसेच चित्रपटाचे निर्माण अभिनेता सुरीयाने पत्नी ज्योतिका (Jyotika)सोबत केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)