Model Sues Cannes Film Festival: कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर मॉडेलसोबत गैरवर्तन; महिलेने दाखल केली तक्रार, नुकसानभरपाई म्हणून 100,000 युरोची मागणी (Watch Video)
बीबीसीशी बोलताना, पोंटिज्स्काने दावा केला की मार्सेलो मिओच्या प्रीमियरसाठी तिने कायदेशीर तिकीट घेऊन आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला ‘क्रूरपणे’ रोखण्यात आले.
Model Sues Cannes Film Festival: युक्रेनमधील एका मॉडेलने कान फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजकांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. रेड कार्पेटवर एका सुरक्षा रक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फॅशन टीव्ही मॉडेल सावा पोंटिज्स्का (Sawa Pontyjska) ही कान महोत्सवात सहभागी झालेल्या अनेक पाहुण्यांपैकी एक होती. स्वतःसोबत घडलेल्या गैरवर्तनाचा एक व्हिडिओही मॉडेलने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक तिला जबरदस्तीने रोखत असल्याचे दिसत आहे, तर ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या झटापटीमध्ये ती जवळजवळ जमिनीवर पडते.
बीबीसीशी बोलताना, पोंटिज्स्काने दावा केला की मार्सेलो मिओच्या प्रीमियरसाठी तिने कायदेशीर तिकीट घेऊन आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला ‘क्रूरपणे’ रोखण्यात आले. मॉडेलने कान फिल्म फेस्टिव्हलवर 'शारीरिक छळ आणि मानसिक इजा' केल्याचा आरोप केला आहे. आपल्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचल्याचे तिने गितले. यासाठी तिने 100,000 युरो नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (हेही वाचा: ‘The Apprentice’ At Cannes: डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनावर आधारीत 'द अप्रेंटिस'ला कान्समध्ये आठ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन; मात्र एका सीनमुळे नव्या वादाला सुरुवात, जाणून घ्या सविस्तर)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)