दिवंगत मराठी अभिनेते शरद तळवळकर यांचा नातू Kapil Talwalkar हॉलिवूडमध्ये गाजवतोय नाव; अनेक चित्रपट, वेबसीरिजमध्ये झळकला
कपिल तळवळकरचा जन्म 8 मार्च 1993 रोजी पुणे, महाराष्ट्रात झाला, परंतु तो लहानपणापासून कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथे वाढला. त्याचे वडील उमेश आणि आई उमा तळवळकर हे टेक इंडस्ट्रीतील व्यावसायिक आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्वर्गीय शरद तळवळकर यांचा नातू कपिल तळवळकर हॉलिवूडच्या चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने नाव कमावत आहे. 32 वर्षीय कपिल हा भारतीय-अमेरिकन अभिनेता, संगीतकार आणि पटकथालेखक आहे, ज्याने ‘Zoey’s Extraordinary Playlist’ आणि ‘Night Court’ यांसारख्या लोकप्रिय अमेरिकन मालिकांमधील भूमिकांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मराठी सिनेसृष्टीत 1950 ते 1990 च्या काळात आपल्या विनोदी आणि गंभीर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शरद तळवळकर यांचा वारसा कपिल आपल्या हॉलिवूडमधील कामगिरीतून पुढे नेत आहे. पुण्यात जन्मलेला कपिल सध्या लॉस एंजेलिसमध्ये राहतो.
कपिल तळवळकरचा जन्म 8 मार्च 1993 रोजी पुणे, महाराष्ट्रात झाला, परंतु तो लहानपणापासून कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथे वाढला. त्याचे वडील उमेश आणि आई उमा तळवळकर हे टेक इंडस्ट्रीतील व्यावसायिक आहेत, तर त्याची बहीण मीरा देखील अभिनेत्री आहे. कपिलला खरी ओळख मिळाली ती 2020 मध्ये एनबीसीच्या ‘Zoey’s Extraordinary Playlist’ या म्युझिकल ड्रामा मालिकेतील टोबिन बात्रा या विनोदी पात्रामुळे. पुढे 2023 मध्ये कपिलने ‘Night Court’ या सिटकॉमच्या रिबूटमध्ये नील वल्लुरी ही भूमिका साकारली, ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. याशिवाय, त्याने ‘Charmed’ (2022) मालिकेत देव बॅनर्जी आणि ‘American Princess’ (2019) मध्ये भूमिका साकारल्या. त्याने ‘The Loud House’ आणि ‘Operation Othello’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे. (हेही वाचा: Harry Potter TV Series: एचबीओच्या नव्या हॅरी पॉटर मालिकेत पार्वती पाटीलच्या भूमिकेसाठी इटालियन अभिनेत्री Alessia Leoni ची निवड; चाहत्यांचा रोष)
Kapil Talwalkar:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2025 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

