Grammy Awards 2025: भारतीय-अमेरिकन संगीतकार Chandrika Tandon यांना 'त्रिवेणी' अल्बमसाठी प्राप्त झाला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार (Video)
चंद्रिका टंडन या जागतिक पातळीवरील बिझनेस लीडर देखील आहेत. त्या पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांच्या मोठ्या बहीण आहेत. त्या चेन्नईमध्ये वाढल्या आणि त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
भारतीय-अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. सर्वोत्कृष्ट न्यू एज, ॲम्बियंट किंवा चँट अल्बम कॅटेगरीमध्ये त्यांना त्यांच्या 'त्रिवेणी' अल्बमसाठी पुरस्कार मिळाला आहे. चंद्रिका टंडन या जागतिक पातळीवरील बिझनेस लीडर देखील आहेत. त्या पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांच्या मोठ्या बहीण आहेत. त्या चेन्नईमध्ये वाढल्या आणि त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. यासह त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
बेस्ट न्यू एज, ॲम्बियंट किंवा चँट अल्बम श्रेणीमध्ये रिकी केजचा ब्रेक ऑफ डॉन, रियुची साकामोटोचा ओपस, अनुष्का शंकरचा अध्याय II: हाऊ डार्क इट इज बिफोर डॉन आणि राधिका वेकारियाच्या वॉरियर्स ऑफ लाईट यांना नामांकन मिळाले होते. यामध्ये चंद्रिका टंडन यांनी बाजी मारली. त्यांनी त्यांचे सहयोगी दक्षिण आफ्रिकेतील फ्लॉटिस्ट वूटर केलरमन आणि जपानी सेलिस्ट एरु मात्सुमोटो यांच्यासमवेत हा पुरस्कार जिंकला. लॉस एंजेलिसमधील Crypto.com एरिना येथे रेकॉर्डिंग ॲकॅडमीतर्फे नुकतेच 67 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. (हेही वाचा: Pune International Film Festival: यंदाच्या 23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक बदलले; आता होणार 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान)
Grammy Awards 2025:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)