'IFFI'मध्ये 'गोदवरी' चित्रपटाला 2 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
निखिल महाजन (Nikhil Mahajan) दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा गोवा (Goa) आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये यंदा मराठी सिनेमा गोदावरीने (Godavari) दोन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. गोव्यातील 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) निखिल महाजन (Nikhil Mahajan) दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)