Snake Venom Supply Case: रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पोहचवण्याचे सारे आरोप Elvish Yadav ने टाळले; पोलिसांना तपासात मदतीचे आश्वासन (Watch Video)

0.1% जरी या प्रकरणात माझा हात असेल तर सारी जबाबदारी घेण्यास आपण तयार आहे अशी प्रतिक्रिया एल्विश यादवने दिली आहे.

Rave Party with Snake Venom: Noida Police Arrest Five, YouTuber Elvish Yadav Booked (Photo Credits: X/@Dhruv_tr108)

सापाच्या विषाची तस्करी करून ते रेव्ह पार्ट्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली एल्विश यादव याच्या विरूद्ध नोएडा मध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर एल्विशने एक व्हिडिओ जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. एल्विशने या प्रकरणामध्ये सारे आरोप फेटाळले आहेत. 0.1% जरी या प्रकरणात माझा हात असेल तर सारी जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचं तो म्हणाला आहे. तसेच या प्रकरणी तपास आणि चौकशी मध्येही आपण यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं तो म्हणाला आहे. एल्विश यादव हा युट्युबर आणि  बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता आहे.  Snake Venom Supply Case: सापाचं विष पुरवठ्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी माजी केंद्रीय मंत्री Maneka Gandhi यांची मागणी .

पहा Elvish ची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now