'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव शरद पोंक्षे पुन्हा करणार 50 प्रयोग
महात्मा गांधींजी यांची हत्या करणार्या नथुराम गोडसे च्या आयुष्यावर हे नाटक बेतलेले आहे.
शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक पुन्हा रंगमंचावर येणार आहे. या नाटकात शरद पोंक्षे यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आज भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी याबाबत माहिती देताना शरद पोंक्षे यांनी लोकाग्रहास्तव पुन्हा 50 भागांसाठी हे नाटक रंगमंचावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पोंक्षे यांनी या नाटकाचा शेवटचा प्रयोग 11 मार्च 2018 दिवशी केला होता. दरम्यान 1997 मध्ये या नाटकाला विरोध झाल्यानंतर 817 व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आलं होतं.
पहा शरद पोंक्षे यांची पोस्ट