‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत लोकप्रिय झालेला कलाकार म्हणजे शंतनू मोघे. सध्या तो ‘सफरचंद’ नाटकात झळकताना दिसत आहे. नुकतंच बोरिवलीच्या एका नाट्यगृहात ‘सफरचंद’ नाटकाचा प्रयोग पार पडला. यावेळी शंतनू मोघेने पायाला दुखापत झालेली असतानाही त्या नाटकाचा प्रयोग केला. यावेळी त्याने हातात वॉकर घेऊन त्याचे पात्र साकारले होते. या प्रयोगाला प्रेक्षकांनीही दाद दिली होती. त्याची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया मराठेने याची पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली.
पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)