Mumbai: दीपक तिजोरीकडून चित्रपटाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक, 'या' प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यावर मोठा आरोप

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दीपक तिजोरी यांनी सहनिर्माते मोहन नाडर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहनने आपली 2.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे अभिनेता-दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.

Deepak Tijori

Deepak Tijori case: 'आशिकी', 'जो जीता वही सिकंदर', 'खिलाडी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरी (Deepak Tijori) जबरदस्त चर्चेत आला आहे. आपल्यासोबत मोठी फसवणूक झाल्याचा दीपकचा दावा आहे. याप्रकरणी अभिनेत्याने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दीपक तिजोरी यांनी सहनिर्माते मोहन नाडर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहनने आपली 2.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे अभिनेता-दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली आहे. दीपक तिजोरीसोबत मोहन नाडर एका थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी, त्याच्या तक्रारीनंतर सह-निर्मात्याविरुद्ध कलम 420 आणि 460 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी तपासही सुरू केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now