Crew Trailer Out: करीना, तब्बू आणि क्रितीचा भन्नाट कॉमेडी अंदाज; 'क्रू'चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?
'क्रू' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये करीना, तब्बू आणि क्रिती यांचा कॉमेडी अंदाज पहायला मिळत आहे.
Crew Trailer Out: अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), तब्बू (Tabu) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या 'क्रू' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये (Crew Trailer)करीना, तब्बू आणि क्रिती यांचा कॉमेडी अंदाज बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी क्रू चित्रपटातील घाघरा हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यात करीना, तब्बू आणि क्रिती यांचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. 'क्रू' या चित्रपटात करीना, तब्बू आणि क्रिती मुख्य भूमीकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत क्रू या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा हे देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत.(हेही वाचा:The Crew Teaser: करीना, क्रिती आणि तब्बूच्या द क्रू चित्रपटाचा टिझर रिलीज, तिघीही दिसणार एअर होस्टेसच्या भूमिकेत )