Diwali 2023: दिवाळीत घर बसल्या कुंटुबासोबत 'हे' हिंदी चित्रपट आणि मालिका नक्कीच पाहा

त्यामुळे एक उत्तम पर्याय घरी बसून कुटुंबासोबत हे चित्रपट नक्कीच पाहा

OTT | Representational image (Photo Credits: pxhere)

Diwali 2023: सगळीकडे दिवाळीची लगबर सुरुच आहे. तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत दिवाळी कशी साजरी करणार याचा विचार तर केलाच असेल. जर यंदा दिवाळीत मुव्ही आणि सीरिज पाहायचे आहे तर दिवाळीत हे सीरिज आणि चित्रपट पाहून प्रियजनासोबत दिवाळी साजरी करू शकता. मनोरंजनासाठी प्रेक्षकांना यंदा दिवाळीत मेजवानी मिळणार आहे. चित्रपट पाहणाऱ्या हौशीना दिवाळी कोणती मालिका आणि चित्रपट पाहावी असा प्रश्न पडलाच असेल. हे चित्रपट पाहून कुटुंबासोबत दिवाळीचा उत्सव साजरा करा. एकीकडे चित्रपट गृहात सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक उत्तम पर्याय घरी बसून कुटुंबासोबत हे चित्रपट नक्कीच पाहा

ये मेरी फॅमिली- हा ड्रामा सीरिज १९९०च्या दशकातल्या कुंटुबाची कथा आहे. Amazon miniTv वर उपलब्ध आहे. कुटुंबात वेळ घालवण्यासाठी हा चित्रपट पाहू शकता.

उंचाई- हा चित्रपट अमिताब बच्चन यांचा आहे. चार मित्रांची कथा आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याची त्यांची इच्छा दाखवण्यात आली आहे.  Zee5वर हा चित्रपट उपलब्ध आहे. मैत्री जपण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्या जोग आहे.

गुलक-एका छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनाभोवती फिरणारा 'गुलक'  कथा दाखवतो.  ही मालिका सोनी LIV वर उपलब्ध आहे.  ही मालिका, मिश्रा कुटुंबाला त्यांच्या जीवनाच्या आधारीत आहे.

पंचायत - ही मालिका Amazon Prime वर अपलब्ध आहे. उत्तर प्रदेशातील खेडेगावातील  तरुणा अस्तित्त्वाचा शोध घेत असतो.

कारवां- हा चित्रपट आयुष्यात अनेक महत्त्वाचे धडे शिकवतो. दिवाळीत हा चित्रपट Amazon Primeवर पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)