Shahid Kapoor : ‘तुम्ही हे थांबवाल का?’ शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत डेटवर असताना पापराझींची हजेरी; फोटो क्लिक करताच संतापला
बॉलीवूड स्टार शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत नुकतेच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले त्यांना पाहताच पापाराझींनी त्याचा मार्ग अडवला. त्यावर शाहिद कपूर काहीसा संतापलेला पहायला मिळाला.
Shahid Kapoor : नुकताच शाहीद कपूरचा तेरी बातों में ऐसा उल्झा जिया चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाच्या यशाने चांगली भरारी घेतल्यानंतर शाहिद कपूर सोमवारी पत्नी मीरा राजपूत(Mira Rajput)सोबत रोमँटिक डेटवर गेला होता. दोघेही रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच पापाराझीं(paparazzi)नी त्यांच्या मार्ग अडवला आणि त्यांचे फोटो काढले. त्यावर शाहीर कपूर काहीसा संतापला. "मित्रांनो, तुम्ही हे थांबवू शकाल का? कृपया थांबवा. नीट वागा." असे म्हणाला. त्यानंतर ते दोघेही कारच्या दिशेने निघून गेले. दोघांनीही एकमेकांना साजेसे काळ्या रंगाचे कपडे घातले होते.शाहिदच्या प्रतिक्रियांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, चाहत्यांनी त्याची तुलना कबीर सिंग या चित्रपटातील त्याच्या पात्राशी केली.(हेही वाचा : Ashwatthama: 'अश्वत्थामा'मध्ये शाहिद कपूर दिसणार मुख्य भूमिकेत, 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)