KGF 2 च्या धमाकेनंतर Yash त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करणार, 8 डिसेंबरच्या सकाळी होणार घोषणा

तसेच यशचा वेगळा अवतार यात पाहायला मिळणार आहे.

केजीएफ चॅप्टर 2 पोस्टर (Image Credit: Twitter)

'KGF 2' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर यश त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी तो त्याच्या पुढील चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करेल. केव्हीएन प्रॉडक्शनच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. यशचा मागील चित्रपट 'KGF 2' केवळ बॉक्स ऑफिसवरच हिट झाला नाही, तर त्याने त्याला संपूर्ण भारताचा स्टार बनवले. अशा परिस्थितीत त्याच्या पुढच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (हेही वाचा - Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरचे बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, पाहा पोस्ट)

या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही, मात्र निर्मात्यांचे म्हणणे आहे की हा एक अ‍ॅक्शनपॅक चित्रपट असेल. तसेच यशचा वेगळा अवतार यात पाहायला मिळणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)