Virender Sehwag React on Adipurush: 'बाहुबलीने कटप्पा को क्यू मारा? आदिपुरुष चित्रपट पाहून समजले', विरेंद्र सेहवाग याची खोचक प्रतिक्रिया
माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या हटके अंदाजात पोस्ट करत विरेंद्र सेहवाग याने म्हटले आहे की, आदिपुरुष पाहिल्यावर समजले की, बाहुबलीने कटप्पाला का मारले? विरेंद्र सेहवाग याचे ट्विट जोरदार व्हायरल झाले आहे.
माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या हटके अंदाजात पोस्ट करत विरेंद्र सेहवाग याने म्हटले आहे की, आदिपुरुष पाहिल्यावर समजले की, बाहुबलीने कटप्पाला का मारले? विरेंद्र सेहवाग याचे ट्विट जोरदार व्हायरल झाले आहे. लोक या ट्विटखाली मजेशीर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. तब्बल 600 कोटी रुपये खर्चून आदिपुरुष सिनेमाची निर्मिती केल्याचे बोलले जाते. या सिनेमाची जोरदार चर्चाही होती. मात्र, त्यातील संवाद आणि एकूणच कथानक पाहून याला प्रसिद्धीच्या तुलनेत प्रेक्षकांचा प्रतिसाद खपच कमी मिळाला. त्या तुलनेत चित्रपटावर टीकाच अधिक झाल्याचे पाहायला मिळाले. खास करुन चित्रपटातील संवाद अधिक वादग्रस्त ठरले. (हेही वाचा,Adipurush Controversy: जम्मूत आदिपुरुष विरोधात आंदोलन, चित्रपटावर बंदी टाकण्याची मागणी )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)