The Sabarmati Report Teaser: विक्रांत मेस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा टीझर प्रदर्शित
टीझरमध्ये गोधरा प्रकरणाबद्दल बातमी देताना विक्रांत या घटनेला दुर्घटना किंवा अपघात मानायला तयार नाहीये
‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात विक्रांत मेस्सी झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाची झलक दाखवणारा एक छोटासा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 27 फेब्रुवारीला विक्रांतने याचा टीझर शेअर केला आहे, ही तारीख निवडण्यामागेही आणखी एक कारण आहे ते म्हणजे ‘गोधरा कांड’ हे 27 फेब्रुवारी 2002 रोजीच घडले होते. हा टीझर शेअर करताना विक्रांतने लिहिलं, 22 वर्षांपूर्वी गोधरा रेल्वेस्थानकात जळणाऱ्या रेल्वेमध्ये 59 लोकांनी त्यांचे प्राण गमावले. त्या सगळ्यांना आज आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)