Video: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी अभिनेते Amitabh Bachchan यांना बांधली राखी; घेतली संपूर्ण बच्चन कुटुंबाची भेट (Watch)
अमिताभ बच्चन यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘आज मी आनंदी आहे. मी मुंबईला अनेकवेळा आले आहे मात्र यावेळच्या मुंबई भेटीमध्ये मी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आणि त्यांना राखीही बांधली.'
रक्षाबंधनानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी राखी बांधली. बॅनर्जी आणि बच्चन दोघांचेही सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि त्यांची जवळीक सर्वश्रुत आहे. यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘आज मी आनंदी आहे. मी मुंबईला अनेकवेळा आले आहे मात्र यावेळच्या मुंबई भेटीमध्ये मी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आणि त्यांना राखीही बांधली. मला हे कुटुंब आवडते. यावेळी आम्ही अनेक जुन्या आठवणींणा उजाळा दिला. मी त्यांना दुर्गापूजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.’अमिताभ बच्चन यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी सक्रियपणे प्रचार केला होता. ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे मुंबईमध्ये उद्याच्या विरोधकांच्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीसाठी आले आहेत. (हेही वाचा: Shah Rukh Khan Visits Vaishno Devi Shrine: 'जवान' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी शाहरुख खानने घेतलं वैष्णोदेवीचं दर्शन)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)