Vicky Kaushal Recites Marathi Poem: मनसे च्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात जेव्हा विकी कौशल ने सादर केली कुसुमाग्रजांची 'कणा..' कविता (Watch Video)
मनसे च्या व्यासपीठावर आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमामध्ये विक्की कौशलने कणा कविता सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.
'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून पुन्हा मराठीजनांची मनं जिंकलेल्या अभिनेत्या विक्की कौशल याने आज मनसेच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. राज ठाकरेंच्या व्हिजन मधील या कार्यक्रमात विविध माध्यमातील दिग्गजांनी मराठी कविता सादर करत आजचा मराठी भाषा गौरव दिन खास केला. मान्यवरांच्या यादीमध्ये विक्की कौशल देखील होता. विक्कीने कुसुमाग्रजांची 'कणा' कविता सादर केली. यावेळी त्याने मनोगत व्यक्त करताना 'छावा' केल्यानंतर या कवितेचा अर्थ अजूनच अधिक स्पष्ट झाल्याचं तो म्हणाला.
विक्की कौशलने वाचली 'कणा' कविता
View this post on Instagram
A post shared by शिवाजी पार्क - Shivaji Park | छत्रपती शिवाजी महाराज पार्क (@shivajipark_)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)