Salman Khan-Vickey Kaushal at IIFA Viral Video: सलमान खानच्या सिक्युरिटी कडून विकी कौशल ला गैरवर्तवणूक? विकी ने त्यावर 'दिसतं तसं नसतं' म्हणत केला थेट खुलासा (Watch Video)

यावेळी विकी कौशलला त्याच्या सिक्युरिटीने दूर केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

Vickey And Salman | Twitter

अबुधाबी मध्ये  नुकताच यंदाचा आयफा सोहळा संपन्न झाला.  बॉलिवूड स्टार्सची या सोहळ्याला हजेरी होती. दरम्यान यामध्येच सलमान खान आणि विकी कौशल समोरासमोरून येत असताना भाईजानच्या सिक्युरिटी टीमने विकीला त्याच्या मार्गातून दूर करत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडीयामध्ये वायरल झाली आहे. यावर विकीने खुलासा केला आहे. अशा प्रकारांमध्ये तुम्हांला व्हिडिओ मध्ये जे दिसतं तसंच असतं असं नाही. याबाबत वायफळ बडबड करण्यात काहीच अर्थ नाही. असं म्हणत त्याने सलमान आणि विकीमध्ये सारं आलबेल असल्याचं म्हटलं आहे. त्याच घटनेनंतर पुन्हा जेव्हा सलमान विकीला भेटला तेव्हा त्याने विकीला घट्ट मिठी देखील मारल्याचं पहायला मिळालं आहे.  Lawrence Bishnoi Top 10 Targets: लॉरेन्स बिश्नोईने आपल्या टॉप 10 टार्गेट लिस्टची दिली कबुली; सलमान खानचे नाव टॉपवर .

पहा विकीला दूर केल्याचा व्हिडिओ

विकी ने दिलेलं स्पष्टीकरण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)