Varun Dhawan and Natasha Dalal welcome Baby Girl: वरुण धवन आणि नताशा दलाल बनले त्यांच्या पहिल्या मुलाचे आई-वडील, कुटुंबात लहान परीचं आगमन!

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांची सून नताशा हिने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आहे.

Varun Dhawan and Natasha Dalal welcome Baby Girl: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या पोटी एक छोटी परी जन्माला आली आहे. काल संध्याकाळी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. ही आनंदाची बातमी वरुण धवनचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांची सून नताशा हिने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. वरुण आणि नताशाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. नताशाच्या बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर करताना अभिनेत्याने सांगितले होते की, तो लवकरच पिता होणार आहे. आता अखेर हा टप्पा त्याच्या आयुष्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Movified (@movifiedbollywood)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)