Rishabh Pant Accident: क्रिकेटर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी उर्वशी रौतेलाने केली प्रार्थना; इन्स्टाग्रामवर शेअर केली 'अशी' पोस्ट
उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ऋषभ पंतचे नाव लिहिले नसून काही पांढऱ्या रंगाच्या पक्षाची इमोजीसह Praying असं लिहिलं आहे.
- Read in
- मराठी
Rishabh Pant Accident: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) साठी प्रार्थना केली. ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला आहे, त्याच्या डोक्याला, पायाला आणि पाठीला जखमा झाल्या आहेत. पंतच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी त्याच्यासाठी चिंतेत पडले आहेत. पंत लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर सर्वजण प्रार्थना करत आहेत. अशातच आता ऋषभ पंतसाठी उर्वशीने लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. उर्वशीने आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे. मात्र, यावरून नेटीझन्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे. अनेकजण तिला ट्रोल करत 'नागिन' म्हणत आहेत.
उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ऋषभ पंतचे नाव लिहिले नसून काही पांढऱ्या रंगाच्या पक्षाची इमोजीसह Praying असं लिहिलं आहे. (हेही वाचा - Rishab Pant Accident CCTV Footage: ऋषभ पंतच्या कारच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पहा कसा झाला अपघात (Watch Video))
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

