The Vaccine War OTT Release: प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली, द व्हॅक्सिन वॉर पाहता येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, जाणून घ्या कधी आणि कुठे
काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट चर्चेत होता. दोन महिन्यापूर्वी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
The Vaccine War OTT Release: काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट चर्चेत होता. दोन महिन्यापूर्वी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमी जादू दाखवली. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट घरीच बसून बघता येणार आहे. चित्रपटात अनेक कलाकांराची फौज पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकर, पल्लवी जोशी,राइमा सेन, अनुपम खेर, गिरिजा ओक, निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा, मोहन कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट डिन्जी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. २४ नोव्हेंबर पासून हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकरांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत 'द व्हॅक्सिन वॉर' ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2023 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

