Chandu Champion Trailer: बहुप्रतिक्षित 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन चर्चेत आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चंदू चॅम्पियन चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिक मुख्य भुमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

Chandu Champion Trailer: PC YOUTUBE

Chandu Champion Trailer:  गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन चर्चेत आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चंदू चॅम्पियन चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिक मुख्य भुमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. चंदू चॅम्पियनचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांनी कौतुक केले आहे. कार्तिकच्या ग्वाल्हेर येथील निवासस्थानी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचे आयोजन करण्यात आले होते. जिथे सर्व माध्यमांच्या उपस्थितीत ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा चित्रपट साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे निर्मित केला आहे आणि कबीर खान दिग्दर्शितही आहे. 'चंदू चॅम्पियन' 14 जून रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (हेही वाचा- स्विगी डिलिव्हरी पार्टनरने तापसी पन्नूकडे दुर्लक्ष करत त्याचे काम केले पुर्ण; व्हिडिओ व्हायरल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement