Vikram Vedha चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस, 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये होणार रिलीज

सैफ आणि हृतिक स्टारर हा चित्रपट 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Vikram Vedha Trailer (Photo Credit - YouTube)

हृतिक रोशन स्टारर 'विक्रम वेधा'चा (Vikram Vedha) दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये हृतिक रोशन दमदार अॅक्शन अवतारात दिसत आहे आणि सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी संयुक्तपणे केले आहे. अॅक्शनने भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या ट्रेलरच्या मध्यभागी राधिका आपटे आणि सैफ अली खान यांच्या रोमान्सची झलकही दाखवण्यात आली आहे. सैफ आणि हृतिक स्टारर हा चित्रपट 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची टक्कर ऐश्वर्या रायच्या पोन्नयान सेल्वन या चित्रपटाशी होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)