The Kerala Story: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नागपुरात पाहिला 'द केरळ स्टोरी' चित्रपट

'द केरळ स्टोरी या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला आहे. काही भाजपशासित राज्यांमध्ये तो करमुक्त केला जात आहे, तर काही राज्यांमध्ये त्यावर बंदीही घातली जात आहे.

The Kerala Story: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नागपुरात पाहिला 'द केरळ स्टोरी' चित्रपट
Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे 'द केरळ स्टोरी' चित्रपट पहिला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. एक प्रबोधनाची मोहीम असे त्यांनी या चित्रपटाचे वर्णन केले. फडणवीस यांनी नागपूरच्या व्हीआर मॉलमध्ये हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'हा चित्रपट नसून जनजागृतीची मोहीम आहे. एक हृदयद्रावक सत्य सिनेमातून समोर आणले जात आहे. समाजात भेदभाव कसा निर्माण केला जातो आणि महिलांवर कसा अन्याय होतो, या सगळ्या गोष्टी यात दाखवल्या आहेत.'

'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला आहे. काही भाजपशासित राज्यांमध्ये तो करमुक्त केला जात आहे, तर काही राज्यांमध्ये त्यावर बंदीही घातली जात आहे. (हेही वाचा: 'The Kerala Story' Controversy: 'द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्या'- NCP MLA Jitendra Awhad)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 10, 2023 12:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).