Takeshi’s Castle New Season: 80 च्या दशकातील ताकेशी कॅसल शोचा नवीन सीझन OTT वर परत येणार, प्रसिद्ध YouTuber करणार कॉमेंट्री
आठ भागांची ही मालिका प्राइम व्हिडिओ इंडियावर प्रेक्षकांसाठी स्ट्रीम केली जाईल.
प्राइम व्हिडिओने आज 80 च्या दशकातील लोकप्रिय जपानी गेम शो, ताकेशी कॅसलच्या भारतीय रीबूट करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अभिनेता आणि कंटेट क्रिएटर भुवन बाम समालोचक म्हणून नवीन भूमिका साकारत आहे. आठ भागांची ही मालिका प्राइम व्हिडिओ इंडियावर प्रेक्षकांसाठी स्ट्रीम केली जाईल. हा नवीन सीझन मूळ आवृत्तीत लोकांनी पाहिलेले वेगळेपण कायम ठेवेल – स्फोटक थरार, मजेदार सेटअप, मजेदार समालोचनासह आव्हानात्मक खेळ पाहता येणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)