Swara Bhasker Pregnancy: स्वरा भास्करने दिली आनंदाची बातमी; पती फहाद अहमदसोबत बेबी बंपचा फोटो केला शेअर, See Photos

त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर मार्चमध्ये तिने फहादसोबत लग्न केले. आता लग्नाच्या काही महिन्यांनंतर अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली आहे.

Swara Bhaskar Shared photo of baby bump with husband (PC - Instagram)

Swara Bhasker Pregnancy: बॉलीवूडची नायिका स्वरा भास्कर (Swara Bhasker) ने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये राजकारणी फहाद अहमदसोबत लग्न केले. अभिनेत्रीचे लग्न तिच्या अनेक चाहत्यांसाठी एक ब्रेकिंग न्यूजचं होती. आता लग्नाच्या तीन महिन्यांनंतर तिने तिच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. स्वरा भास्करने 16 फेब्रुवारी रोजी सपा नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर मार्चमध्ये तिने फहादसोबत लग्न केले. आता लग्नाच्या काही महिन्यांनंतर अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली आहे. फोटो शेअर करताना स्वराने लिहिले की, 'कधीकधी देव तुमच्या सर्व प्रार्थनांना एकत्र उत्तर देतो. नवीन जगात प्रवेश करण्यासाठी धन्य, कृतज्ञ आणि उत्साही. यासोबतच स्वराने असेही सांगितले की, तिच्या बाळाचा जन्म ऑक्टोबरमध्ये होणार आहे. (हेही वाचा - Adipurush: 'आदिपुरुष'च्या स्क्रिनिंगदरम्यान भगवान हनुमानासाठी राखीव ठेवण्यात येणार एक सीट)

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)