Sushant Singh Rajput: सोशल मिडीयावर सुशांतच्या कारचा व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक
सुशांत सिंग राजपूतच्या कारचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण आजही चाहते सुशांतला विसरू शकलेले नाहीत. सध्या सोशल मिडीयावर सुशांतच्या पाटणाच्या (Patana) घरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत सिंह राजपूतची पांढऱ्या रंगाची MH02GD4747 नंबर असलेली रेंज रोव्हर (Range Rover) कार स्पष्टपणे दिसत आहे. सुशांतचा फोटो कारच्या शेजारी असलेल्या टेबलवर ठेवण्यात आला आहे.सुशांत सिंग राजपूतच्या कारचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण येत आहे.
पहा व्हिडीओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)