Stampede at Bade Miyan Chote Miyan Lucknow Promotions: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साह; 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या प्रमोशनवेळी झाली चेंगराचेंगरी (Watch Video)
ते स्टेजवर आल्यानंतर चाहत्यांच्या जमावाने पुढे जाण्याच्या प्रयत्नात बॅरिकेड तोडले, त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Stampede at Bade Miyan Chote Miyan Lucknow Promotions: बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सध्या या चित्रपटाचे निर्माते आणि संपूर्ण स्टारकास्ट 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोमवारी लखनौमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाखल झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर येत आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमावेळी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दोघेही स्टंट करत स्टेजवर आले. ते स्टेजवर आल्यानंतर चाहत्यांच्या जमावाने पुढे जाण्याच्या प्रयत्नात बॅरिकेड तोडले, त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, यादरम्यान जमाव पांगला. काही काळानंतर जमावाने स्टेजच्या दिशेने चप्पल फेकण्यास सुरुवात केली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या या गोंधळाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Pankaj Udhas Dies: प्रसिद्ध गझल गायक पद्मश्री विजेते पंकज उदास यांचे निधन)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)