Jawan Mania: 51 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई मध्ये Gaiety Galaxy चे दरवाजे प्रेक्षकांसाठी सकाळी 6 वाजता उघडणार
मुंबईतील Gaiety Galaxy येथे सकाळी 6 वाजता शो मिळवणारा पहिला हिंदी चित्रपट बनून 'जवान' इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. दक्षिणेतील सिनेमे अशाप्रकारे सकाळी उपलब्ध असतात.
शाहरूख खानच्या 'जवान' सिनेमाची सध्या त्यांच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. पठाणच्या यशानंतर आता किंग खानचा 'जवान' काय धमाल करणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंग लवकरच सुरू होणार आहेत पण तत्पुर्वी मीडीया रिपोर्ट्सनुसार समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईच्या आयकॉनिक Gaiety Galaxy मध्ये या सिनेमासाठी सकाळी 6 वाजता पहिला शो दाखवला जाणार आहे. असं झाल्यास हा मागील 51 वर्षातील पहिलाच प्रकार असणार आहे. यापूर्वी पठाण सकाळी 9 वाजता दाखवला होता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)