Lok Sabha Election Results 2024: "शर्मनाक है अयोध्यावासियों..." , अयोध्येतील निकालाबद्दल गायक सोनू निगमची पोस्ट
भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला असून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षाचे 37 आमदार आघाडीवर आहेत. याच पार्श्वभूमीवरून प्रसिद्ध बॉलीवूड गायक सोनू निगमने एक्सवर अयोध्यावासियांना टोला लगावला आहे.
भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला असून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षाचे 37 आमदार आघाडीवर आहेत. याच पार्श्वभूमीवरून प्रसिद्ध बॉलीवूड गायक सोनू निगमने एक्सवर अयोध्यावासियांना टोला लगावला आहे. भाजप 33 ठिकाणीच आघाडीवर आहे. त्यामुळे सोनू निगम याने नाराजी व्यक्त केली आहे. सोनू निगम एक्सवर पोस्ट करत म्हणाला, “ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचा कायापालट केला, नवीन विमानतळ दिलं, रेल्वे स्थानक दिलं, 500 वर्षांनंतर राम मंदिर उभारून दिलं, एका मंदिराच्या जोरावर अर्थव्यवस्था उभारून दिली, त्या पक्षाला अयोध्या मतदारसंघात संघर्ष करावा लागत आहे. अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब आहे.”
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)