Singham Again: रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन चित्रपटात झळकणार 'हा' अभिनेता, स्पेशल टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत
रोहितने या अभिनेत्याचा फर्स्ट लूकचे फोटो शेअर केले आहेत ज्यात अभिनेता हटके लुक मध्ये दिसत आहे
Singham Again: सिंघम अगेन चित्रपटासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपट सिंघम अगेन यात अभिनेता टायगर श्रॉफ नव्या भुमिकेत झळकणार आहे. चित्रपट निर्मात्याने अभिनेत्याचे काही फोटी शेअर करून अधिकृत घोषणा केली आहे. टायगर एसीपी सत्या या स्पेशल टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहितने टायगरचे फर्स्ट लूकचे फोटो शेअर केले आहेत ज्यात अभिनेता वेगळ्या लुक मध्ये दिसत आहे. आगामी चित्रपटाच अॅक्शन थ्रिलरमध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर खान यांच्यासोबत त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक प्रतिक्षा करत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाचा वर्दीतला फोटो व्हायरल झाला होता. तर आता टायगरच्या चाहत्यांना या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)