Singer Bhupinder Singh Passes Away: बॉलिवूडवर शोककळा; ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंग यांचे निधन
भूपेंद्र सिंह यांचा जन्म ब्रिटिश राजवटीत पंजाब प्रांतातील पटियाला या संस्थानात 8 एप्रिल 1939 रोजी झाला. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे देखील संगीतकार होते.
ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग (Bhupinder Singh) यांचे सोमवारी संध्याकाळी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंग यांनी याबाबत माहिती दिली. गेले काही दिवस ते अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. सिंग यांनी 'मौसम', 'सत्ते पे सत्ता', 'आहिस्ता आहिस्ता', 'दूरियां', 'हकीकत' अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
भूपेंद्र सिंह यांचा जन्म ब्रिटिश राजवटीत पंजाब प्रांतातील पटियाला या संस्थानात 8 एप्रिल 1939 रोजी झाला. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे देखील संगीतकार होते. सुरुवातीला भूपेंद्र यांनी आकाशवाणीवर आपला कार्यक्रम सादर केला. आकाशवाणीवरील त्यांचे परफॉर्मन्स पाहून त्यांना दूरदर्शन केंद्र, दिल्ली येथे संधी मिळाली. तेथे ते व्हायोलिन आणि गिटारही शिकले. 1968 मध्ये संगीतकार मदन मोहन यांनी त्यांचा ऑल इंडिया रेडिओवरील कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांना दिल्लीहून मुंबईला बोलावले. त्यांना सर्व प्रथम हकीकत चित्रपटात संधी मिळाली, जिथे त्यांनी 'होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा' ही गझल गायली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)