Yodha New Poster: सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केलं 'योधा'चे नवीन पोस्टर; या दिवशी रिलीज होणार टिझर

सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर 'योधा'चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. हातात बंदूक घेऊन सिद्धार्थ आपली नजर त्याच्या निशाण्यावर ठेऊन आहे.

Yodha New Poster: सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केलं 'योधा'चे नवीन पोस्टर; या दिवशी रिलीज होणार टिझर
Yodha New Poster (PC - Instagram)

Yodha New Poster: सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित 'योधा' (Yodha) चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. गेल्या वर्षी करण जोहरने या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ला 'वॉरियर'च्या भूमिकेत पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योधा' या चित्रपटाची पहिली झलक समोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होणार याची घोषणा करण्यात आली. टीझर रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाचे एक शानदार पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये अभिनेत्याचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर 'योधा'चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. हातात बंदूक घेऊन सिद्धार्थ आपली नजर त्याच्या निशाण्यावर ठेऊन आहे. हे पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फोकस सेट, डेस्टिनेशन इन साईट!'

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2024 04:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).