Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर जादू कायम, 600 कोटींचा टप्पा गाठणार

श्रध्दा कपूर आणि राजकूमार राव यांचा स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या हॉरर-कॉमेडीने 33 दिवसांत त्याच्या खर्चापेक्षा 915% अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर आता तो रोज नवा विक्रमही करत आहे.

Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर जादू कायम, 600 कोटींचा टप्पा गाठणार
Photo Credit-X

Stree 2 Box Office Collection: श्रध्दा कपूर आणि राजकूमार राव यांचा स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.  या हॉरर-कॉमेडीने 33 दिवसांत त्याच्या खर्चापेक्षा 915% अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर आता तो रोज नवा विक्रमही करत आहे. सोमवारी पाचव्या आठवड्यात या चित्रपटाने केवळ आमिर खानचा १५ वर्षांचा विक्रमच मोडला नाही तर शाहरुख खानच्या 'जवान'लाही मोडीत काढले आहे. स्त्री २ हा ६०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट बनणार आहे. पाचव्या आठवड्याच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी ३.६० कोटी, शनिवारी ५.५५ कोटी, रविवारी ६.८५ कोटी आणि सोमवारी ३.१७ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. एकूणच, आतापर्यंत या चित्रपटाने 583.35 कोटी रुपयांचा जबरदस्त व्यवसाय केला आहे. (हेही वाचा- सोहम शाहच्या 'तुंबाड' या चित्रपटाने केला तीन दिवसांत 7 कोटींहून अधिकचा व्यवसाय)

'स्त्री 2'ची बॉक्स ऑफिसवर कमाई 

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2024 12:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).