Sherlyn Chopra On Rahul Gandhi: शर्लिन चोप्राला करायचं आहे राहुल गांधींसोबत लग्न; पण अभिनेत्रीने काँग्रेस नेत्यासमोर ठेवली 'ही' अट
शर्लिन चोप्राने म्हटले आहे की, ती राहुल गांधींसोबत लग्न करू शकते. पण त्यासोबत तिने एक अटही ठेवली आहे. सध्या सोशल मीडियावर शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या अनेक चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे.
Sherlyn Chopra On Rahul Gandhi: शर्लिन चोप्रा ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आपल्या वक्तव्यामुळे ती अनेकदा वादातही आली आहे. आता पुन्हा एकदा शर्लिन चोप्रा तिच्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. शर्लिन चोप्राने म्हटले आहे की, ती राहुल गांधींसोबत लग्न करू शकते. पण त्यासोबत तिने एक अटही ठेवली आहे. सध्या सोशल मीडियावर शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या अनेक चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे. यादरम्यान एका पापाराझीने शर्लिन चोप्राला विचारले आहे की, ती राहुल गांधींसोबत लग्न करू शकते का? यावर अभिनेत्रीने उत्तर देताना म्हटलं आहे की, 'हो, का नाही, पण लग्नाच्या वेळी माझे आडनाव चोप्रा राहावे असे मला वाटते.' शर्लिन चोप्राचा हा व्हिडिओ तिच्या फॅन क्लबने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)