Shehnaaz Gill चे वडील Santokh Singh Sukh यांना जिवे मारण्याची धमकी; आरोपी म्हणाला, दिवाळीपूर्वीचं मारून टाकेन!

त्यांना अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये, संतोख भारतीय जनता पक्षात सामील झाले होते आणि 25 डिसेंबर रोजी दोन अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळीबार केला होता.

Shehnaaz Gill and her Father Santokh Singh Sukh (PC - Instagram)

Shehnaaz Gill Father Santokh Singh Sukh Gets Death Threat: बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल (Shehnaaz Gill) चे वडील संतोख सिंग सुख (Santokh Singh Sukh) यांना एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिली आहे. त्या अनोळखी व्यक्तीने दिवाळीपूर्वी त्यांना मारून टाकणार असं सांगितलं आहे. शहनाजचे वडील तरंटनला जात असताना एका व्यक्तीने त्यांना फोन करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्या व्यक्तीने संतोखला जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यांना अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये, संतोख भारतीय जनता पक्षात सामील झाले होते आणि 25 डिसेंबर रोजी दोन अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळीबार केला ज्यामध्ये ते थोडक्यात बचावले होते. (हेही वाचा -

पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर अमृतसरचे असून त्यांनी संतोखवर दुचाकीवरून हल्ला केला होता. त्यात ते बचावला होते. संतोख बियासला जात असताना जंदियाला गुरु परिसरातील एका ढाब्यावर थांबल्यावर ही घटना घडली. वॉशरूममध्ये जाण्यासाठी तो ढाब्यावर थांबला होता, तिथे संधी मिळताच अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)